Tuesday 23 July 2019

Tankan Shodhan



Tankan Shodhan


1. Ashuddha Tankan + Water  
 ↓

2. Filtered Solution

 ↓

3. Evaporating water from Tankan

 ↓

4. Final Product

  Shuddha Tankan








Sunday 10 March 2019

रजोनिवृत्तीकाळातील जीवनशैली

 


                                                               रजोनिवृत्तीकाळातील जीवनशैली

                                                                                                                                                                                                                                    डॉ.नंदिनीआनंदमोरे
असो .प्रोफेसर,रसशास्त्रविभाग ,
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ ,कॉलेज ऑफ आयुर्वेद , पुणे .
मोबाईल नंबर :९४२२००४७३२
________________________________________________________________________
रजोनिवृत्ती हि स्त्रींजीवनातील महत्वाची शारीरिक वमानसिक अवस्थाबदलणारी नैसर्गिकप्रक्रिया आहे.रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रींची दरमासाला येणारी मासिकपाळी कायम बंद होणे हि अवस्था नैसर्गिक आहे .या अवस्थांतून प्रत्यके स्त्रींला जावे लागते .त्याकाळामध्ये निर्माण होणारी लक्षण माहीत नसल्यामुळे ती घाबरूनजाते .  
साधारणपणे मासिकपाळी हि वयाच्या चाळीस ते पंचावन्न वयापर्यंत बंद होते .आयुर्वेदाच्या दृष्टीकोणातून शरीरातील शुक्रधातू व्यक्त झाला कि यौवन प्राप्त होते मग मासिक पाळी सुरु होते.जन्मापासून शरीरातील रसधातू पासून शुक्रधातू पर्यंत सर्वधातूची वाढ झाल्यानंतर साधारणपणे सोळाव्यावर्षी शुक्रधातूची अभिव्यक्ती होते त्यानंतर त्या धातूंचा विकास हा पन्नास वर्षापर्यंत होत राहतो . म्हणून या काळात स्वाभाविक कालावधी चा अंतराने नियमित पाळी येते व पुढे पन्नाशीनंतर ह्ळुहूळु पाळी लांबत जाते . साधारणपणे मासिकपाळी जर सहामहिण्यापर्यंत आली नाही तर रजोनिवृत्ति झाली असे समजलें जाते . हया काळामध्ये बीज धारणाकरणाऱ्या पेशी इस्ट्रोजेन नावाचा ग्रंथी निर्माण करतात .परंतु चाळीशीनंतर इस्ट्रोजेन चे प्रमाण कमीकमी होतं जावून रजोनिवृत्तीचा काळात पूर्णपणे बंदहोतेआयुर्वेदानुसार पन्नाशी नंतर वातकाळ सुरु झाल्यामुळे शुक्रधातू स्वाभाविकपणे हळूहळू अव्यक्त होते व परिणामतःमासिकपाळीबंदहोते.
पाळी बंद होणे याचा अर्थ बीज कोषांची कार्यक्षमता संपते. जोपर्यंत बीजकोष कार्यक्षम असतो तो पर्यंत गर्भाशयातून रजप्रवृत्ती नियमित होते व गर्भधारणा होऊ शकते. साधारण चाळीस ते पन्नासवर्षापर्यंत शुक्रधातूक्षीण होतो त्यामुळे बीजकोष कार्यक्षम राहत नाही.परिणाम स्वरूप मासिक पाळी बंद होते.म्हणजेच या काळात स्त्रीची प्रजनन क्षमता संपते . या काळात स्वाभाविकपणे घडणाऱ्या शुक्रक्षीणतेमुळे अनेक विकार निर्माण होऊ शकतात , त्यामुळे हा काळस्त्रियांसाठी मानसिकदृष्या ठीक नसतोत्यामुळे अनेक व्याधीनिर्माण होऊ शकतात .उदा.संधीवात ,अस्थी ठिसूळ होणे,   कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे केस गळणे आमवात ,विकार होऊ शकतात.
अस्वास्थकरलक्षणे:
रसधातू क्षीण लक्षणेअनियमितपाळी ,त्वचारुक्षहोणे,  निस्तेजकोरडीपडणेछातीत धडधडणे,थकवा येणे.
रक्त धातूक्षीण लक्षणेअग्निमांद्यत्वचावैवर्ण्य ,
 )मांसधातू क्षीण लक्षणेवजनकमीहोणे,
मेद धातूक्षीण लक्षणे:शरीर बळ कमी होणेइंद्रियदौर्बल्य ,संधीवेदनासांध्यांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना ,
अस्थीधातू क्षीण लक्षणे :हाडे ठिसूळ होणेसांधे खिळखिळे होणेकेस गळणे .
मज्जाधातू क्षीण लक्षणे मलावरोध ,मलाचा खडा होणेडोळे ओढवणे , अंधेरी येणे , झोप न लागणे.
शुक्रधातूक्षीण लक्षणेवारंवार तोंड सुकणेअंग दुखणे .
 )ओजक्षीण लक्षणे:स्मरण शक्ती कमी होणेकांती व डोळे निस्तेज दिसणेआत्मविश्वास कमी होणेभीती वाटणे , मनात वाईट विचार येणे,  अकारण रडू येणे
मानसिकलक्षणे प्रसन्न न वाटणे ,नैराश्य , आकलन शक्ती कमी होणे .
रजोनिवृत्ती काळामध्ये पाळी अनियमित येते त्यामुळेशरीराला २५ – ३० वर्षे दर महिन्या ला दोष बाहेर टाकण्याची सवय असते ती बंद होते . त्यामुळे शरीरात दोष साचून राहतात व अस्वस्थपणा वाढतो .जेंव्हा शरीराला दोष पचन करण्याची सवय झाली कि हळूहळू लक्षणे कमी होतात.साधारणपणे एक ते दोन वर्षे हा त्रास कमी अधिक प्रमाणात होत राहतो .काही वेळा हृदयविकार,रक्तदाब , मधुमेह ,कॅन्सर ह्यासारख्या संचयात्मक रोगांची शक्यता निर्माण होऊ शकते . कारण शरीरातील दोषाचे शोधन होण्याचे बंद होते .तसेच ज्या स्त्रियांची स्वाभाविक रजोनिवृत्तीकाळाच्या आधी च काही कारणास्तव गर्भाशय काढावा लागतो त्यानाविशेषकाळजी ध्यावी लागते . 
रजोनिवृत्ती काळातील आहारविहार     
सकाळ चा नाश्ता    -  भाताची खीर , तांदळाचीखीरशिंगाड्याच्यापिठाचीखीर,गायचेदूध .तसेच तूप भातमुगाच्या डाळीची खिचडी  , पोळी भाजी सेवन केल्यामुळे मनाची तृप्ती व शरीराचे पोषण होते .ज्या स्त्रीयांना मधुमेह आहे किंवा स्थूल आहे तत्यानी खिरीत साखर घालू नये .
नारळाचे पाणी आठवड्यातून २-३ वेळा प्यावे .मनुकाचे सूप (काढा ) नियमितपणे रात्री जेवनापूवी घ्यावे .आहारातगहू , बाजरीजोंधळा , आंबेमोहोर , तांदूळ  , ह्यांचा समावेश करावा .डाळीमध्ये मुगाचीडाळ ,उडदाची डाळयांचा समावेश करावा .बदामभोपळाकाकडीखरबूजयांचा बियासेवन कराव्यात .अंजीरडाळिंब,पेरू या सारखी बहूबीजफळेसेवनकरावीत .आवळारसकिंवाएकआवळाउकडूननियमितसेवनकरावा .दुपारी - खारीक ,खोबरेखजूर ,चारोळ्या , जर्दाळू ,सुकामेवायांचासमावेशकरावा.          फळ - डाळींब ,आवळाबोरे , द्राक्ष सेवन करावीत .   भाज्या - कोहळा ,भोपळा , काकडी,  घोसाळे , दोडकी,पडवळ ,यांचेभाज्या किंवा सूप यांचा समावेश करावाहिरवी मिरची हि पित्ताचा क्षोभनिर्माण करणारी ,शुक्रक्षीणकरणारी ,वातवर्धकत्याऐवजी आलेसुंठ वापरावे . आणि जिरे ,धनेकोथम्बीर लसूण ,कांदाया मसाल्याचा उपयोग विशेषतः करावा .                   
अशा प्रकारे योग्य ती काळजी व आहार यांचे पालन केले तर रजोनिवृत्तीचा काळ हा सुखकर होऊ शकतोत्यासाठी कुटूंबाचा पाठिंबा व खालील गोष्टीचा प्रामुख्याने होऊ शकतो .
या काळामध्ये स्त्रियांची शारीरिक व मानसिक काळजी घेणे आवश्यक असते.या प्रक्रियांमध्ये कुटुंबामधील पती ,मुले , सासूयांचा महत्वाचा भाग आहे .स्त्रियांचा हार्मोनल असमतोल असल्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये बदल होतो त्यामुळे तिच्याशी वर्तणूक करताना तिच्या मनाची काळजी घेणेआवश्यक आहे .
सक्रिय जीवनशैली ,व्यायाम आणि छंद – स्त्रियांनी आनंदाने प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होणे तिच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे . वाचन ,समाजकार्य , संगीत , कुटुंबाशी व मित्राशी संभाषण या गोष्टी मनापासून कराव्यात .
व्यायाम सकाळी १५-२०मिनिटचालणे ,खेळ , वेगवेगळे छंद जोपासावेत .
प्राणायाम –मानसिक स्वास्थ चांगलेराहते ,ताण कमी होतो , मूड चांगला राहतो  .
तैलमसाज –हाडे ठिसूळ होणे ,कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते ते वाढवण्यासाठी रोज तैलाने मसाज करावा . महानारायणतैल ,क्षीरबलातैलं रोज किंवा आठवड्यातून१-२वेळा लावावे .
आहार – कॅल्शिअमयुक्त आहार जास्त प्रमाणात , हिरव्या पालेभाज्या , लोहाचे प्रमाण जास्त ,घृत , फळे यांचा समावेश असावा .
अपथ्यकर आहार - तैलकट ,जास्त मीठ व साखर युक्त आहार वर्ज्य करावा .
रजोनिवृत्तितील लक्षणासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती :
लाक्षणिक चिकित्सेबरोबर दोषांना समस्थितीत आणणारी चिकित्सा करावी .   साधारण पणे ४० ते ५० वर्षाच्या महिलांमध्ये पित्त आणि वातदोष वाढलेले असतात . म्हणून त्याना समस्थितीत आणावेत .रजोनिवृत्तिसाठी काही औषधी कल्प :   औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत.  स्वतःच्या मनाने घेऊ नये .
पुष्यानुगचूर्ण : याचा उपयोग अत्यार्तव ,  श्वेतस्त्राव , पाळीच्या विकृती , विविध कारणमुळे होणारा अत्यार्तव
अशोकारिष्ट : कष्टार्तव , अत्यार्तव , ज्वर , रक्तप्रदर
पत्रांगासव :अत्यार्तव , श्वेतस्त्राव , ज्वर
ताण ,नैराश्य , निद्रानाश साठी काही औषधे  : 
)  अश्वगंधाअरिष्ट  :याचा उपयोग अश्रद्धा , ताण आरति यामध्ये बल व व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी याचा उपयोग करतात .
जिरकारीष्ट :पचनविकृती ,  ग्रहणी दौर्बल्य
बलारिष्ट :मज्जावह संस्थेच्या विकृती ,  वातविकृती   , मांसपीडा व संधीशूल व दौर्बल्य
 )चंद्रप्रभावटी:   मूत्रवहसंसर्ग , मूत्रकष्टता . मूत्रअश्मरी .मलावस्तंभ ,उद्गार , उदरशूल,  कटीशूल,  योनिशुष्कता ,बहुमूत्रता , मूत्रकृच्छता
)  गोक्षुरादिगुग्गुळ : प्रमेह , मूत्रकष्टत* , स्त्रियांच्या रोगामध्ये विशेषतः अत्यार्तव .
6)  कामदुधारस , प्रवाळपिष्टी  ; पित्तशामक व कॅल्शियमपोषकसर्वांगदाह
7) तृणपंचमुळं क्वाथ :मूत्रवह संस्थानच्या विकृती  , मूत्रदाह
रक्ताल्पतेसाठी रक्तपोषक औषधी द्यावीत . लोहासव  , अमलकीरसायनधात्रीलोह,सप्तामृतालोह,  सारिवाद्यावलेह   .
रसायनचिकित्सा :
स्त्रियामध्ये रसायनकर्मासाठी कोणतीही औषधे वैद्याच्या सल्ल्यानुसार वापरू शकतात . त्यामुळे थकवा निराशा ,रक्ताल्पता इ . लक्षणांमध्ये उपयोग होतो .
1शतावरी रसायन  स्त्रीविशिष्ट रोगामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात . मूत्रमार्गाचे व्याधी ,यकृतरोगामध्ये .
2सुकुमारीघृत :स्त्रियांमध्ये पोटदुखी.  विद्रधी ,मूळव्याध,कष्टार्तव , गर्भाशयसूज , मलावस्तंभ
घरगुती उपाय :मेथीचे लाडू , हळीव लाडू .गरम दुधाबरोबर घ्यावेत .
रजोनिवृत्ती हि एक नैसर्गिक प्रक्रिया असते व त्यामधून प्रत्येक स्त्रीला जावे लागते . जेव्हा पाळी दर महिन्याला यायची कायमची थांबते . असे सलग १२ महिने झाले म्हणजे रजनिवृत्ती झाली असे समजावे
रजोनिवृत्ती हा आयुष्यातील पूर्ण विराम नसतो , किंबहुना आयुष्यातील नवीन सुरुवात करण्याची एक नवी संधी असते .

Friday 25 January 2019


आरोग्य वर्धिनी ; बहुगुणी कल्प
डॉ. नंदिनी आनंद मोरे , असो . प्रोफेसर, रसशास्त्र भैषज्यकल्पना विभाग               
  भारती विद्यापीठ,कॉलेज ऑफ आयुर्वेद,पुणे                              
 मोबाईल नंबर : ९४२२००४७३२ _______________________________________________________                               आयुर्वेद शास्त्रामध्ये आरोग्य वाढवणारी हि गुटी आहे , म्हणून तिला आरोग्यवर्धिनी हे नाव दिले आहे.   चांगले आरोग्य राखण्यासाठी हा कल्प वनस्पती रसौषधी  पासून  तयार केला आहे. आरोग्यवर्धिनी हे   एक खल्वि रसायन आहे. मुख्यत यकृत विकार, त्वचा विकार आणि विविध रोगा मध्ये वापरले जाणारे   बहुउद्देशीय कल्प आहे. ते सर्व शरीर प्रणाली चे कार्य सुधारते त्यामुळे सर्व रोगा मध्ये उपयुक्त आहे. त्याचे कार्य यकृत, मूत्रपिंड, आंत्र , गुदाशय अशा विविध अवयवावर दिसते .यकृतातील दोष काढण्यासाठी उपयोग केला जातो .म्हणून हे औषध यकृत विकारा मध्ये महत्वाची भूमिका बजावते. आरोग्यवर्धिनी मध्ये मुख्यत:   आमलकी , बिभीतकी , हरितकी, गुग्गुळ , चित्रकमूळ, कुटकी, शिलाजीत, कज्जली, लोहभस्म, अभ्रक भस्म  ताम्रभस्म हे घटक द्रव्ये आहेत. या सगळ्यांना कडू निंब पत्ररसाच्या भावना दिल्या आहेत. यामधील घटक द्रव्यांची गुण कर्मे खालील प्रमाणे आहेत.
आमलकी :
रस: लवण रस वगळता पंचरसात्मक ,वीर्य: शीत , विपाक :मधुर      
गुण:लघु, रुक्ष, शीत गुणात्मक, त्रिदोषावर विशेषत: पित्तदोषावर विशेष कार्य   . 
कर्म :रोचन, अनुलोमन आणि यकृत उत्तेजक.  अँटिबायोटिकस, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी याचे कार्य दिसून येते . 
रोगघ्नता: यकृत वृद्धी ,कामला ,शोथ, अग्निमांद्य , पांडू , दाह ,कर्करोग आणि रसायन म्हणून उपयुक्त आहे.
बिभीतकी
रस: कषाय, वीर्य: उष्ण, विपाक :मधुर   
गुण: रुक्ष, लघु गुणात्मक  आणि विशेषत: कफदोषावर  आणि त्रिदोषावर कार्य    .   
कर्म: शोथहर, वेदनाहर, दीपन, कृमिघ्न, जंतू विरोधी, बुरशी रोधक, अँटिहिस्टॅमिन , रेचक    
रोगघ्नता : शोथ, अग्नीमांद्य, आध्मान ,अश्मरी, कृमिरोग.  
हरितकी :
 रस:  पंच रसात्मक , वीर्य: उष्ण,   विपाक : मधुर     
 गुण: रुक्ष , लघु, आणि त्रिदोषशामक विशेषतः वात दोष हर  .   
 कर्म :शोथहर, दीपन , यकृत उत्तेजक कृमिघ्न  .
 रोगघ्नता : जंतू विरोधी, बुरशी रोधक,  रसायन आणि हिपॅटायटीस बी विरोधी कार्य . 
 गुग्गुळ :
 रस : तिक्त, वीर्य : उष्ण, विपाक : कटू   .
गुण : लघु, तीक्ष्ण आणि स्निग्ध त्रिदोषहर विशेषत: वात कफ  शामक   आहे .
 कर्म: वेदनास्थापन, व्रणशोधन, शोथहर,व्रणरोपण,दीपन, कृमिघ्न आणि रसायन,अँटीफंगल, अँटिबायोटिकस   बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, संधी शूल नाशक  
 रोगघ्नता : ग्रंथी, अर्श वातव्याधी ,आणि कुष्ठ , मेदनाशक ,शुलनाशक  .
  चित्रक:
  रस :कटू, वीर्य : उष्ण , विपाक: कटू   .   
 गुण : लघु,रुक्ष , तीक्ष्ण, वात कफशामक आणि पित्तवर्धक कार्य  .
 कर्म:लेखन, दिपन,पचन,ग्राही,शोथहर आणि कृमिघ्न     .
रोगघ्नता : ज्वरघ्न , अँटीफंगल, अँटिबायोटिकस, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, कर्करोगा मध्ये,   अर्बुद , यकृत रक्षणाचे कार्य. अग्निमांद्य, यकृतविकार , शोथ आणि रसायन.  
 कुटकी:
रस: तिक्त, वीर्य :शीत , विपाक : कटू   
गुण: रुक्ष, लघु ,त्रिदोषशामक, विशेषत: कफ शामक . 
 कर्म : भेदन, विरेचन, दिपन कार्य, यकृत उत्तेजक , जंतू च्या वाढीस प्रतिबंधक , हिपॅटायटीस व्हायरस विरोधी , बुरशी रोधक .  
 रोगघ्नता : उदररोग,  कामला, यकृत प्लीहा वृद्धी , पांडू ,ग्रहणी     .
 शिलाजतुः   
रस: मधुर तिक्त , वीर्य:उष्ण ,विपाक; कटू   . 
गुण : लघु आणि स्निग्ध वात कफ हर        
कर्म : बल्य , रसायन, वाजीकरण, लेखन आणि योगवाही                   
रोगघ्नता : पाण्डु रोग, मेदोरोग , यकृत प्लीहा वृद्धी आणि अर्श.      .
 कडुनिंब पत्र रस  भावना : -  
 रस: तिक्त कषाय ,वीर्य: शीत आणि विपाक: कटू    .
 गुण: लघु, रुक्ष ,वात , पित्त सारक   .
 कर्म: कृमिघ्न , शोथ, व्रणशोधन , ग्राही, दिपन आणि यकृत उत्तेजक आहेत. हे अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, ग्रंथीनाशक आणि यकृत रक्षक.      .
रोगघ्नता : कृमिघ्न, कुष्ठ, दाह,शोथ ,त्वचा रोग, कामला', आणि यकृत विकार  .
अभ्रक भस्म:   
रस : मधुर, वीर्य :शीत, विपाक मधुर   . 
 गुण : गुरु, शीत , स्निग्ध          
 कर्म: दीपन, बल्य आणि वर्ण्य      .
रोगघ्नता : उदर, कफ पित्तज विकार , मेध्य आणि रसायन  .
लोह भस्म 
  रस: तिक्त कषाय, वीर्य : शीत, विपाक : मधुर    
गुण : रुक्ष , गुरु 
कर्म: दिपन , बल्य आणि त्रिदोष शामक  .
रोगघ्नता :  यकृत  प्लिहा  विकार , पांडू, सर्वरोगहर , ग्रहणी , आणि रसायन  .
ताम्र  भस्म  -  रस: तिक्त , कषाय  मधुर , वीर्य:  उष्ण  आणि विपाक: कटू     
 कर्म:  लेखन , दिपन  , विषहर  पित्तस्राव करणारे     ,   
रोगघ्नता : पांडू, कुष्ठ ,  यकृतविकार,  .
 सारांश : वरील सर्व द्रव्यांच्या  एकत्रीकरणामुळे त्या गुटीचा रस कटू तिक्त , वीर्य अनुष्ण शीत विपाक कटू  होतो. हि लघु रुक्ष कफपित्तनाशक , रस प्रसादक, अग्नी दीपक, क्लेदनाशक , मलभेदन या कर्मामुळे  सर्व रोगनाशक , सर्व प्रकारच्या त्वकविकारावर , कुष्ठ , विविध ज्वरामध्ये, आम पाचक , अग्निदीपन , यकृत प्लीहा वृद्धी , कामला , मेदोरोग हर , हृद्रोग मध्ये बल्य  , मलावष्टम्भ , पांडू रोग , क्लेद नाशक, म्हणून उपयोग होतो .आरोग्यवर्धीची एकंदर रचना ग्रहणी पक्वाशयातील विकृती नष्ट करणारी आहे. म्हणून या सर्व गुणामळे ती सर्वरोगहर म्हणून  वापरली  जाते . 
     __________________________________________________________________