Friday 25 January 2019


आरोग्य वर्धिनी ; बहुगुणी कल्प
डॉ. नंदिनी आनंद मोरे , असो . प्रोफेसर, रसशास्त्र भैषज्यकल्पना विभाग               
  भारती विद्यापीठ,कॉलेज ऑफ आयुर्वेद,पुणे                              
 मोबाईल नंबर : ९४२२००४७३२ _______________________________________________________                               आयुर्वेद शास्त्रामध्ये आरोग्य वाढवणारी हि गुटी आहे , म्हणून तिला आरोग्यवर्धिनी हे नाव दिले आहे.   चांगले आरोग्य राखण्यासाठी हा कल्प वनस्पती रसौषधी  पासून  तयार केला आहे. आरोग्यवर्धिनी हे   एक खल्वि रसायन आहे. मुख्यत यकृत विकार, त्वचा विकार आणि विविध रोगा मध्ये वापरले जाणारे   बहुउद्देशीय कल्प आहे. ते सर्व शरीर प्रणाली चे कार्य सुधारते त्यामुळे सर्व रोगा मध्ये उपयुक्त आहे. त्याचे कार्य यकृत, मूत्रपिंड, आंत्र , गुदाशय अशा विविध अवयवावर दिसते .यकृतातील दोष काढण्यासाठी उपयोग केला जातो .म्हणून हे औषध यकृत विकारा मध्ये महत्वाची भूमिका बजावते. आरोग्यवर्धिनी मध्ये मुख्यत:   आमलकी , बिभीतकी , हरितकी, गुग्गुळ , चित्रकमूळ, कुटकी, शिलाजीत, कज्जली, लोहभस्म, अभ्रक भस्म  ताम्रभस्म हे घटक द्रव्ये आहेत. या सगळ्यांना कडू निंब पत्ररसाच्या भावना दिल्या आहेत. यामधील घटक द्रव्यांची गुण कर्मे खालील प्रमाणे आहेत.
आमलकी :
रस: लवण रस वगळता पंचरसात्मक ,वीर्य: शीत , विपाक :मधुर      
गुण:लघु, रुक्ष, शीत गुणात्मक, त्रिदोषावर विशेषत: पित्तदोषावर विशेष कार्य   . 
कर्म :रोचन, अनुलोमन आणि यकृत उत्तेजक.  अँटिबायोटिकस, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी याचे कार्य दिसून येते . 
रोगघ्नता: यकृत वृद्धी ,कामला ,शोथ, अग्निमांद्य , पांडू , दाह ,कर्करोग आणि रसायन म्हणून उपयुक्त आहे.
बिभीतकी
रस: कषाय, वीर्य: उष्ण, विपाक :मधुर   
गुण: रुक्ष, लघु गुणात्मक  आणि विशेषत: कफदोषावर  आणि त्रिदोषावर कार्य    .   
कर्म: शोथहर, वेदनाहर, दीपन, कृमिघ्न, जंतू विरोधी, बुरशी रोधक, अँटिहिस्टॅमिन , रेचक    
रोगघ्नता : शोथ, अग्नीमांद्य, आध्मान ,अश्मरी, कृमिरोग.  
हरितकी :
 रस:  पंच रसात्मक , वीर्य: उष्ण,   विपाक : मधुर     
 गुण: रुक्ष , लघु, आणि त्रिदोषशामक विशेषतः वात दोष हर  .   
 कर्म :शोथहर, दीपन , यकृत उत्तेजक कृमिघ्न  .
 रोगघ्नता : जंतू विरोधी, बुरशी रोधक,  रसायन आणि हिपॅटायटीस बी विरोधी कार्य . 
 गुग्गुळ :
 रस : तिक्त, वीर्य : उष्ण, विपाक : कटू   .
गुण : लघु, तीक्ष्ण आणि स्निग्ध त्रिदोषहर विशेषत: वात कफ  शामक   आहे .
 कर्म: वेदनास्थापन, व्रणशोधन, शोथहर,व्रणरोपण,दीपन, कृमिघ्न आणि रसायन,अँटीफंगल, अँटिबायोटिकस   बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, संधी शूल नाशक  
 रोगघ्नता : ग्रंथी, अर्श वातव्याधी ,आणि कुष्ठ , मेदनाशक ,शुलनाशक  .
  चित्रक:
  रस :कटू, वीर्य : उष्ण , विपाक: कटू   .   
 गुण : लघु,रुक्ष , तीक्ष्ण, वात कफशामक आणि पित्तवर्धक कार्य  .
 कर्म:लेखन, दिपन,पचन,ग्राही,शोथहर आणि कृमिघ्न     .
रोगघ्नता : ज्वरघ्न , अँटीफंगल, अँटिबायोटिकस, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, कर्करोगा मध्ये,   अर्बुद , यकृत रक्षणाचे कार्य. अग्निमांद्य, यकृतविकार , शोथ आणि रसायन.  
 कुटकी:
रस: तिक्त, वीर्य :शीत , विपाक : कटू   
गुण: रुक्ष, लघु ,त्रिदोषशामक, विशेषत: कफ शामक . 
 कर्म : भेदन, विरेचन, दिपन कार्य, यकृत उत्तेजक , जंतू च्या वाढीस प्रतिबंधक , हिपॅटायटीस व्हायरस विरोधी , बुरशी रोधक .  
 रोगघ्नता : उदररोग,  कामला, यकृत प्लीहा वृद्धी , पांडू ,ग्रहणी     .
 शिलाजतुः   
रस: मधुर तिक्त , वीर्य:उष्ण ,विपाक; कटू   . 
गुण : लघु आणि स्निग्ध वात कफ हर        
कर्म : बल्य , रसायन, वाजीकरण, लेखन आणि योगवाही                   
रोगघ्नता : पाण्डु रोग, मेदोरोग , यकृत प्लीहा वृद्धी आणि अर्श.      .
 कडुनिंब पत्र रस  भावना : -  
 रस: तिक्त कषाय ,वीर्य: शीत आणि विपाक: कटू    .
 गुण: लघु, रुक्ष ,वात , पित्त सारक   .
 कर्म: कृमिघ्न , शोथ, व्रणशोधन , ग्राही, दिपन आणि यकृत उत्तेजक आहेत. हे अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा, ग्रंथीनाशक आणि यकृत रक्षक.      .
रोगघ्नता : कृमिघ्न, कुष्ठ, दाह,शोथ ,त्वचा रोग, कामला', आणि यकृत विकार  .
अभ्रक भस्म:   
रस : मधुर, वीर्य :शीत, विपाक मधुर   . 
 गुण : गुरु, शीत , स्निग्ध          
 कर्म: दीपन, बल्य आणि वर्ण्य      .
रोगघ्नता : उदर, कफ पित्तज विकार , मेध्य आणि रसायन  .
लोह भस्म 
  रस: तिक्त कषाय, वीर्य : शीत, विपाक : मधुर    
गुण : रुक्ष , गुरु 
कर्म: दिपन , बल्य आणि त्रिदोष शामक  .
रोगघ्नता :  यकृत  प्लिहा  विकार , पांडू, सर्वरोगहर , ग्रहणी , आणि रसायन  .
ताम्र  भस्म  -  रस: तिक्त , कषाय  मधुर , वीर्य:  उष्ण  आणि विपाक: कटू     
 कर्म:  लेखन , दिपन  , विषहर  पित्तस्राव करणारे     ,   
रोगघ्नता : पांडू, कुष्ठ ,  यकृतविकार,  .
 सारांश : वरील सर्व द्रव्यांच्या  एकत्रीकरणामुळे त्या गुटीचा रस कटू तिक्त , वीर्य अनुष्ण शीत विपाक कटू  होतो. हि लघु रुक्ष कफपित्तनाशक , रस प्रसादक, अग्नी दीपक, क्लेदनाशक , मलभेदन या कर्मामुळे  सर्व रोगनाशक , सर्व प्रकारच्या त्वकविकारावर , कुष्ठ , विविध ज्वरामध्ये, आम पाचक , अग्निदीपन , यकृत प्लीहा वृद्धी , कामला , मेदोरोग हर , हृद्रोग मध्ये बल्य  , मलावष्टम्भ , पांडू रोग , क्लेद नाशक, म्हणून उपयोग होतो .आरोग्यवर्धीची एकंदर रचना ग्रहणी पक्वाशयातील विकृती नष्ट करणारी आहे. म्हणून या सर्व गुणामळे ती सर्वरोगहर म्हणून  वापरली  जाते . 
     __________________________________________________________________